DVET CBT-२ व्यावसायिक चाचणी प्रवेशपत्र जाहीर | DVET Admit Card 2023 Download
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील शिल्प निदेशक – १४५७ पदे भरण्याकरिता दि.१७/०८/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र.१/२०२२ च्या अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांची सामायिक परीक्षा (CBT- १) दि.२८ व २९/०९/२०२२ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल दि.२३/०२/२०२३ रोजी घोषित करण्यात आला होता. उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) दि.०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
सामायिक परीक्षेत (CBT – १) किमान ४५% (५४ गुण) (Normalization – Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करुन व्यावसायिक चाचणी (CBT – २) करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून दि.०८/०३/२०३ ते १८/०३/२०२३ या कालावधीत व्यावसायिक चाचणी (CBT -२) करिता अर्ज स्विकारण्यात आले होते.
विहित शुल्कासह अर्ज केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी (CBT-२) दि.०५/०६/२०२३ ते ११/०६/२०२३ व १३/०६/२०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. व्यावसायिक चाचणीकरिता प्रवेशपत्र (Admit Card) प्राप्त करुन घेण्याकरिता उमेदवारांना परीक्षेच्या किमान ७ दिवस आधी ई-मेलद्वारे Link उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी सदर Link द्वारे त्यांचे व्यावसायिक चाचणीचे प्रवेशपत्र Download करुन घेणे आवश्यक राहील. तरी उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment